marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

टक्केवारीच्या ओझ्याखाली
गुदमरलेले मूल!
म्हणजे परीक्षांच्या वेलीवरचे
बिनवासाचे फूल!!

भक्तीच्या भयानक भोवऱ्यामध्ये
भोळा भक्त भरकटतो
मंदिर- मशिदीच्या गाभाऱ्यातही
सत्तेचा सर्प सरपटतो

‘सूरज’ ढळला ‘पश्चिमेकडे
‘प्रेम दिवानी’ रुचली नाही!
‘राजश्री’ ची नवी संस्कृती
रसिकांना पचली नाही!!
परदेशी गुंतवणूक? माहिती नाही!
कळतात त्यांचे हेतू आतले’
त्यांच्या परदेशी वारीमध्ये
कळतात त्यांचे हेतू ‘आतले’

जनतेचे लाखो रुपये ‘गुंतले’
चीन आमचा मित्र होतोय
आता आगळीक घडणार नाही
निदान दोन्ही देशांची जनता,
लोकसंख्या कमी पडणार नाही

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu