marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

हिंसाचाराचा लोकशाहीशी
सक्तीचा प्रणय घडत आहे
भोळ्या जनतेला पंखाखाली घेऊन
‘भारतीय घटना’ रडत आहे.

एमपीएससीचा निकाल लागणार केव्हा?
वर्षामागून वर्ष गेले
बहुतेक सुनबाई नातवाला म्हणेल
“आजी आजोबा ‘पीएसआय’ झाले!”
विज्ञान आणि धर्मसुद्धा
आपली कशी जिरवतो
म्हणूनच आपला देवसुद्धा
‘बंदोबस्तात मिरवतो!

जे जे खोटेनाटे आपणासी ठावे
ते ते बिनधास्त मोर्चात बोलावे।
वेडे करून सोडावे सकळजन॥

कमळाच्या अंगामध्ये जरी
मृतात्म्यांचा सदरा आहे
मतांसाठी मनामध्ये
अजूनदेखील गोध्रा आहे!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu