marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

सुंदर ‘सिलसिला’ प्रेमाचा,
लम्हे’ ‘चाँदणी’त न्हाले
‘यशस्वी ‘पागल दिल’वाल्यांना
फाळके प्रसन्न झाले!

अभिनय आता कोणी ‘करी-ना’
धनाच्या ‘अमिषा’ त वस्त्र त्यागले!
चेहऱ्याचे ‘संवाद’ संपून

आता ‘देह’ बोलू लागले
हातातले सेक्युलर सिक्के
अचानक खोटे झाले
आजकाल आपल्या धर्मापेक्षा
कमळ ‘मोठे झाले!

पुरस्कार किती ‘मनोहर’
याची तर बातच सोडा
पुरस्कार देणाऱ्याच्या
चारित्र्याचे रेकॉर्ड’ काडा!

‘इब्राहिम’चे पलायन
व्यर्थ नाही गेले!
नेहमीप्रमाणे ‘सीबीआय’वाले
दुबई फिरून आले!!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu