marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

कलेचे भांडे तसेच ‘रिते’
‘हाथ ची देशमुखी चमकत राही
पडदा असो, की राजकारण
अभिनयाला पर्याय नाही!

मतपेटीचा ‘बळी’ देऊन
अर्थसुधारणा ‘कर’वत नाही
क्रांतिकारी ‘विजय’ आम्ही
कधीच पचवत नाही

ग्रंथ आणि पांढरी टोपी
वाद घालून ‘भेंडा’ळले!
कृष्णाकाठचे ‘यशवंत’ शब्द
खुर्चीच्या सावलीत झाकोळले!

क्रिकेट वीरांचे तिमिर जावो।
“विश्वचषक’ सूर्ये पाहो॥
‘धावा’, ‘धावा’ फोडती टाहो।
रसिकजात॥

‘बलवान म्हणवून घेणारे ‘वीर’
भलत्याच ‘पाशात गुंतून जातात
मने तशीच दुभंगलेली
‘देहभान हरपून जातात!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu