marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

विठू या दर्शनासाठी उद्या
प्रस्थान ठेवेल माऊली
वेदांनी केव्हाच ‘समाधी’ घेतली
रेडे मात्र पावलोपावली

संस्कार आणि पैसा
नव्या युगाचे मित्र!
डोनेशनच्या पावतीवर
सरस्वतीचे चित्र!!

साखर कारखाना दे गा देवा!
अध्यक्षांना ‘साखरेचा’ रवा!!
सहकार आयुक्त ‘रत्न’ थोर!
त्याला राजकारणाचा मार!!

पुन्हा पावसाळी अधिवेशनाच्या
ऊबदार गप्पा रंगू लागतील
पुन्हा गरिबांच्या तुझुंब झोपडीत
पाण्यावर भांडी तरंगू लागतील

प्रश्न- उत्तरांच्या जंजाळात
करपून बालपण गेले
शिक्षकांचे ‘सर’ पण जाऊन
शिक्षणाचे ‘सरपण’ झाले

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu