marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

आता त्यांना रात्रंदिवस
काळजी बोचायला लागेल
२७२ जादुई आकडा
स्वप्नामध्ये नाचायला लागेल

पायात पाय घालणारे
एकमेकांचे वाली होतील
बंद असणारी नाती
अचानक खुली होतील

विंदा करंदीकर म्हणून गेले
देणाऱ्याने देत जावे
आम्ही मते दिली
आता खाणाऱ्याने ‘खात’ जावे

पेपरात बातमी छापून येईल
विजयाची भव्य सभा झाली
त्याच पानावर पुन्हा वाचा
शेतकऱ्याने आत्महत्या केली

आपलेच घर, आपलीच कौले
‘मायेच्या अंगणात कमळाची वेल
मतपेटी घेते परीक्षा, आणि
राजकारण पास, लोकशाही फेल!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu