marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

असा सतत जवळ राहा
गरिबांची संगत सोडू नये!
‘राज्य’ इकडे, ‘कर्ता’ तिकडे
असे कधी घडू नये!

जे असेल ते दाखवणे, ही
खऱ्या सौंदर्याची जात नाही।
पडद्यावरच्या विश्वसुंदरींचा
काही ‘अंदाज’च येत नाही॥

नियमन कशाचे? भार कुणावर?
घेता अंधारचा ठाव
वीजबिलांच्या रोशनी उजळे
मंडळाचा गाव!

कोटी कोटी संस्कार
आता इतिहासजमा झाले
‘प्लेविन’चे कोटी कोटी
राम, रमी, रमा, झाले!!

भिक्षेकरी, गरीबडा, छकुला
मंदिरातून रूसून गेला,
जो तो आला पाय
त्याचे पोत्याले पुसून गेला!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu