marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

नावात ‘उत्तर’ असलेल्या प्रदेशाला
रोज एक प्रश्न सडकत आहे
काशिरामाच्या ‘माया जाळी
कमळ अलगद अडकत आहे!

हे ‘यु.पी.’ माझे घर
ऐसी मति ‘माया’ची स्थिर
किंबहुना ‘काशिराम’
‘अटल’ झाला!

शहिदांच्या रक्ताळलेल्या चितेकाठी
महात्मा अजूनही जागतो आहे
सिनेमावाल्यांच्या दुर्दैवी जाचातून
भगतसिंग ‘स्वातंत्र्य’ मागतो आहे

अवचित उठला, पार्टीत घुसला
‘भरत’-भेट देऊन गेला!
‘भुजात’ ‘बळ’ असले तरी,

पापणीत पाणी ठेवून गेला!
माणूस आणि मूर्ती
कणाकणाने दुभंगत आहे,
म्हणूनच वर्षातून तीन वेळा
शिवबा जन्म घेत आहे?

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu