marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

अरे कप्तान कप्तान
ठेव बॅट चुल्ह्यावर
धावा’ राहू दे ‘महाराजा’
आधी प्राप्तीकर भर!

भ्रष्टाचाराच्या भयाण जंगलात
माणुसकी आता गहाणवट आहे,
कायदेशीर ‘आत्महत्या करावी तरी
‘मुद्रांक’सुद्धा बनावट आहे!

सोज्वळ ‘मिसाईल’ हळूहळू
राष्ट्रपती भवनात घुसू लागले,
अण्वस्त्रांनी अमर झालेले
रामेश्वरम हसू लागले!

‘बटाट्याची चाळ’ अजूनही
व्यक्ती, वल्लींना झुलवीत आहे,
रुक्षावलेल्या पोस्टालाही
‘पुलकित करूनी, फुलवीत आहे!

‘सीएम रूपी दहीहंडीसाठी
‘गोविंद’ केव्हा टपले आहे,
‘विलासी’ हास्य जपून ठेवा
‘पतंग ही उडू लागला आहे!

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu