marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita

खुसखुशीत

राजकीय ‘शॉक’ बसलेला महाराष्ट्र
मंत्रिमंडळाची वरात पाहणार आहे.
‘नियमन’ सरकारचे ‘भार’ मात्र
बिचारी जनता वाहणार आहे!

टाळ-मृदंग वर साचलेली
बडव्यांची धूळ झाड!
विठ्ठला, तू आता तरी
कमरेवरचे हात काढ!I

रक्षण थोडे, ‘भक्षण’ फार
कुणी कुणासाठी कण्हायचं
तू मला अन् मी तुला
खा-की’ खा-की’ म्हणायचं!

भाजी आणि भाकरी पलीकडे
आमच्या जीवनाला आशय नाही
त्यांच्या महान चर्चेत मात्र,
‘रामा शिवाय दुसरा विषय नाही!

भारतरत्नाच्या काळजातून
खरा ‘सूर’ बरसत नाही!
सत्तेच्या सनई’ वादनातून
सरकारलाही फुरसत नाही

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

 

marathi kavita

Leave a Reply

Close Menu