Marathi Kavita – कोयना – #369 – The Best

Marathi Kavita – कोयना

धन्य धन्य ती कोयना,
महाराष्ट्राची भाग्यविधाती विकासाची तव योजना
मागे फिरुनी नौजा पोफळी केली वीजनिर्मिती,
केवढी ही झाली देशाची प्रगती
महाराष्ट्राला वीज मिळाली,
खेड-पाडी आनंदून गेली
कोयनानगर हे नंदनवन जाहले,
परण पहाण्या जगातून मोठे शास्त्रज्ञ आले
किती गाऊ तीची ख्याती, ती दृष्ट लागण्या झाली,
खरोखर तिला दृष्ट कुणाची लागली, थरथर कोयना हलू लागली
मने सर्व भवभीत झाली,
११ डिसेंबर काळ-रात्र ठरली
कोयना सारी उध्वस्त बघ झाली,
सारी स्वप्न भंगून बघ गेली
कोयना केवीलवाणी बघ झाली,
किती रंगविली स्वप्न क्षणात सारी विसरून गेली
निवती कृपा केली आमुच्यावरी
परत आलो आम्ही आमुच्या घरी,
म्हणूनच हे काव्य लिहिते मी कोयनेवरी
अडतीस वर्ष जाहली आजूनी मन कापरे,
आठवणीने भरतो ऊर नेत्री अश्रू पाझरे

Leave a Reply

Close Menu