Marathi Kavita – मायेची लेक – #369 – The Best

Marathi Kavita – मायेची लेक

लेक चालली सासरी आई सांगते कानात
कुणी कितीही बोलल रहा हसरी
ठेव सारं ग मनात
लेक चालली सासरी रूप न्याहळते दुरूनी
बालपणीच्या खोड्या आणि खेळ आठवता
आले नेत्र भरूनी
राहुदे तिच्यावर तुझी प्रेमाची सावली
निरोप तिचा आला सुखी आहे मी सासरी
आई जशी सासू पिता जसे आहेत सासरे
मन मोकळे किती माझे दीर नणंदा हासरे
स्वच्छ आरशा सारखे आहेत माझे पती
येता जाता पाहते होकावून जाते सुखावून किती
सांगतेआई बाबा नका मनी तुम्ही बावरू
संसारी सुखी आहे तुमच प्रेमाचं पाखरू

Leave a Reply

Close Menu