Marathi Kavita – नियती – #369 – The Best

Marathi Kavita – नियती

मनामनाचे जुळले सुंदर बय नाते
हृदय पाखरू धुंद गीत गाते
प्रेम तुझे जपले मी शिंपल्यातला बघ मोती
किती येतील आणा भाका होऊ आपण जिवनसाथी
संसाराची स्वप्न रंगविली किती जागवल्या बघ राती
स्वप्न तुझे अधुरे राहील मनी म्हणे नियती
नकोस होऊस निराश मनी माझ्या बकुळ फुला
आपण दोये भेटू पुन्हा श्रध्दा आहे मनी मला
खरे प्रेम आणि निष्ठा माझी पुन्हा जन्म घेईन
तुझे प्रेम मी तुला अर्पनी मनी धन्य होईन
पुर्नजन्म ही होता मिलन कवेत घेऊ नभ सारे
चंद्र हासतो मनात बघ सुटले धुंद धुंद वारे

Leave a Reply

Close Menu