Marathi Kavita – परदेश – #369 – The Best

Marathi Kavita – परदेश

परदेशी जाण्याचे ठरवले आनंद झाला उरी
तुम्हा सर्वांना सोडून जाणार आम्ही दूरी
जाण्याचीही सर्व तयारी पूर्ण आम्ही केली
आमच्या सुनांची खरदेची गडबड झाली
पर्स, गॉगल, बुट, चप्पल, ड्रेस आणि बरेच काही
सर्व खरेदी पूर्ण झाली राहिले न काही
विमानात बसताना मन आमुचे बावरले
सुखरूप परत नंदनवनी येऊ दे, देवा साकडे घातले
सुंदर स्वप्न ते बघावया नियाले याई-घाई
सर्व बोलले जाता साता समुद्रापलिकडे
काळजी घ्या हो अण्णा-आई
मुंबई सोडून युरिक गाठले
विमानातून उतरताच डोळे आमुचे दिपले
स्वित्झर्लंडचे सौंदर्य कसे असेल लावून बघा तर्क
ढगांचे सौंदर्य आणि डोळे दिपविणारा बर्फ
रोप-वे मध्ये बसताना जीव होता मुठीत
माऊंट टीटलीस पाहन मन आल खुशीत
पॅरीसचा आयफेल टॉवर बघुन आली खुपच पॉवर
इटलीतील तो पिसाचा मनोरा
मनी उमलला फुलांचा फुलोरा
इटलीत खायला गेलो होतो पिइझा
मॅनेजरच्या मुलीनं मागितली साडी, खूप आली मज्जा
बँकॉकला तर काव ? हिन्यांचा कारखाना सफारी बाग
हे पहाण्यासाठी भल्या पहाटेच आली जाग
समुद्रातील टॉवर आहे हो पटावा देशी
ते पाहूनी श्रीलंका वरून आलो हो मावदेशी
सर्व देश पाहून आलो मनी मावेना खुशी
सहलीमध्ये भेटले सोबती मजा आली खुप अशी
नातवंडे सुविचार आजी-आजोबा ट्रीप तुमची कशी झाली?
आनंदाश्रूंनी भरले डोळे
ऑरेंज ज्युस पिताना तुमची आठवण आली
जगावेगळे चार पुत्र आणि सुजा मिळाल्या हौशी
म्हणूनच झाली आमची भ्रमंती परदेशी

Leave a Reply

Close Menu