marathi kavita – पूर – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #3

पूर

एका पुराची मी
भयानक बातमी वाचतो आहे
घराघरातील गाएगा मडक्यांत
व्यवहारी गाळ साचतो आहे

टाळ मृदंग भिजले
उंबरे आत्म्याची गाय
भक्ती वाहून गेली
उरले विठ्ठलाचे पाय
ते पाहा, पुराच्या तळाशी
ज्ञाना-तुकाचे अनुभव पुरले
धगधगत्या सीमा
आता केवळ ‘अनुभव उरले.

ऐकताय का जीवघेणा
पुराच्या उरातला स्वर
तरीही व्यर्थ बडबड

एकमेकांना धर
चिऊ-काऊ अन् बटव्यासह

प्रवाहात आजी वाहून गेली
संगणकाच्या पडद्यावर
रंगीत संगीत श्रद्धांजली.
जीवघेणे मखमली पूर
जेव्हा मातीचे हिशोब मागतील
तेव्हा अभंगांचे दीपस्तंभ अन्
ओव्यांच्या नावा कराव्या लागतील!

Marathi Kavita In English

Eka puraci mi
bhayanaka batami vacato ahe
gharagharatila ga’ega madakyanta
vyavahari gala sacato ahe

tala mrdanga bhijale
umbare atmyaci gaya
bhakti vahuna geli
urale viththalace paya
te paha, puracya talasi
jnana-tukace anubhava purale
dhagadhagatya sima
ata kevala ‘anubhava urale.

Aikataya ka jivaghena
puracya uratala svara
tarihi vyartha badabada

ekamekanna dhara
ci’u-ka’u an batavyasaha

pravahata aji vahuna geli
sanganakacya padadyavara
rangita sangita srad’dhanjali.
Jivaghene makhamali pura
jevha matice hisoba magatila
tevha abhangance dipastambha an

 

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu