Marathi Kavita – संक्रांत – #369 – The Best

Marathi Kavita – संक्रांत

तिळागुळांनी युगायुगांचे नाते बप जपले
आपण त्यांना साथ देऊ ब्रिद हे अपुले
गृहिणींना नटणे आणि हळदीकुंकास जाणे हिच असे पर्वणी
तिये भेटतील स्नेही सोबती आणि प्रिय मैत्रिणी
एकमेकांना तिळगुळ देऊ आणि घेऊ
नववर्षाच्या शुभेच्छा आपण त्यांना देऊ
सर्वांना सांगू तिळगुळ अमुचे सांडू नका
क्षणभर सारे विसरुन जाऊ लटकेही कधी भांडू नका
जपू आपण सारे गोडीचे आणि स्नेहाचे नाते
तिळगुळ घ्या आणि गोड बोला मनी गीत गाते

Leave a Reply

Close Menu