Marathi Kavita – ।। श्री गजानन प्रसन्न ।। – #369 – The Best

Marathi Kavita – ।। श्री गजानन प्रसन्न ।।

देवाचा हा देव गणपती सर्वांहूनी वेगळा
वाहते दूर्वांकूर कोवळा
कार्यारंभी प्रथम वंदिती तुजसी सर्व जगती
तू सर्वांचा त्राता बघ हा मनी वसे भक्ती
विघ्नेशा तू अष्टविनायक किती तुला नावे
तुझे नाम येता घेता मन रंगुनी जावे
भजनी रंगती सर्व मंडळी अपूर्व हा सोहळा
वाहते टूर्वाकूर कोवळा
पूजेसाठी आणिवले बय टूर्वाकूर आणि लाल फुले
आवडती तुज मोदक तेही घेऊन बघ आले
धूप, दीप, नैवेद्य आरती श्रद्धेने करिते
आशिर्वादा तुझ्या बघ मी नतमस्तक होते
रूप तुझे हे सुंदर बघता गंध केशरी टीळा
वाहते टूर्वाकूर कोवळा

Leave a Reply

Close Menu