marathi kavita – येडपट कुठला – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita 

येडपट कुठला

जग त्याला वेडपट म्हणते…

तो म्हणाला, गाथा वाचा, अरे वाचा बायबल
तर कुणी खेकसले- त्यापेक्षा वासू दे आम्हाला
‘मराठी-इंग्रजी ‘डिक्शनरी’- आमचे नॉलेज वाडेल
वासू दे ‘माडर्न रेसिपी’ – भुकेची क्वॉलिटी वाढेल

जग अजूनही येडपट म्हणते
त्याने सांगितले, झाडाची सावली आपली माऊली
तर कोण ओरडले, कॉम्प्लेक्स काय तुझ्या डोंबलावर बांध?
शुद्ध हवेचा कशाला बाऊ?
फार तर गच्चीत कुंडी ठेवू

येडपट म्हणणे चालूच आहे
तो म्हणाला, हृदयावर कोरलेले संस्कार आहेत ना?
मग देवळात वांझोटी गर्दी कशाला?
मंदिरांचे कॉन्ट्रॅक्टर बहुत झाले

कशाला हवा उशाला भक्तीचा वशिला?

तो बडबडला, नेमाने प्रीमियम भरणारे
लक्झुरिअस आयुष्य झेपते कसे तुम्हाला?
काचेत ठेवलेले मुर्दाड देव
पावतील कसे तुम्हाला?

तो एक ठार येडपट
फेमस झाले त्याचे गाणे..
अरे भयानक शहाण्यांनो!
स्वतःची कबर खणून या
कधीतरी येडपटाच्या गावी
पाहुणे बनून या….

Marathi Kavita In English

Jaga tyala vedapata mhanate…

to mhanala, gatha vaca, are vaca bayabala
tara kuni khekasale- tyapeksa vasu de amhala
‘marathi-ingraji’diksanari’- amace noleja vadela
vasu de’madarna resipi’ – bhukeci kvoliti vadhela

jaga ajunahi yedapata mhanate
tyane sangitale, jhadaci savali apali ma’uli
tara kona oradale, kompleksa kaya tujhya dombalavara bandha?
Sud’dha haveca kasala ba’u?
Phara tara gaccita kundi thevu

yedapata mhanane caluca ahe
to mhanala, hrdayavara koralele sanskara aheta na?
Maga devalata vanjhoti gardi kasala?
Mandirance kontrektara bahuta jhale

kasala hava usala bhaktica vasila?

To badabadala, nemane primiyama bharanare
lakjhuri’asa ayusya jhepate kase tumhala?
Kaceta thevalele murdada deva
pavatila kase tumhala?

To eka thara yedapata
phemasa jhale tyace gane..
Are bhayanaka sahanyanno!
Svatahci kabara khanuna ya
kadhitari yedapatacya gavi
pahune banuna ya….

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu